कल्याणमध्ये मोटारीने घेतला पेट, वाहतूक कोंडी

रविंद्र खरात
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

कल्याण पश्चिम डी मार्ट परिसरात आज (गुरुवार) दुपारी दोनच्या सुमारास पार्क केलेल्या मोटारीने पेट घेतला यामुळे एकच खळबळ उडाली. कल्याण शिवाजी चौक, वलीपिर रोड, जोकर टॉकीज परिसरात वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्याने वाहन चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

कल्याण : दिवाळी आणि कडकडीत पडलेले ऊन त्यात कल्याण पश्चिममध्ये दोन च्या सुमारास एका मोटारीने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली काही काळ वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

कल्याण पश्चिम डी मार्ट परिसरात आज (गुरुवार) दुपारी दोनच्या सुमारास पार्क केलेल्या मोटारीने पेट घेतला यामुळे एकच खळबळ उडाली. कल्याण शिवाजी चौक, वलीपिर रोड, जोकर टॉकीज परिसरात वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्याने वाहन चालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिस, वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. काही काळ त्या परिसरात वाहतूक थांबवली होती. तर आग नियंत्रणात आणेपर्यंत मोटार जळून खाक झाली होती. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून संबधित गाडीच्या चालकाला पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

Web Title: kalyan news fire on car in kalyan