कल्याणमध्ये प्लास्टिक सदृश तांदूळ; नागरिकांत संभ्रम

रविंद्र खरात
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात नवरात्र उत्सव मोठ्या धुमधाम मध्ये सुरू असून आज (गुरुवार) अनेक ठिकाणी प्रसाद बनविला जात आहे. नेतवली परिसरात प्रसाद बनविण्यासाठी तांदूळ खरेदी केले. तब्बल 4 तास झाले तांदूळ शिजेना त्यामुळे संशय आला. त्यानंतर हा तांदूळ प्लास्टिक सदृश असल्याचा संशय असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, याबाबत अन्न व औषध ठाणे विभागाने चौकशी सुरू केली आहे.

कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात नवरात्र उत्सव मोठ्या धुमधाम मध्ये सुरू असून आज (गुरुवार) अनेक ठिकाणी प्रसाद बनविला जात आहे. नेतवली परिसरात प्रसाद बनविण्यासाठी तांदूळ खरेदी केले. तब्बल 4 तास झाले तांदूळ शिजेना त्यामुळे संशय आला. त्यानंतर हा तांदूळ प्लास्टिक सदृश असल्याचा संशय असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, याबाबत अन्न व औषध ठाणे विभागाने चौकशी सुरू केली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या नवरात्रीची धुमधाम सुरू आहे. आज अष्टमी असल्याने अनेक ठिकाणी प्रसाद बनविला जात आहे. ठाकुर्ली येथे राहणारे बाळकृष्ण शेट्टी (वय 50) हे कल्याण मधील बिग बाजार मध्ये काम करत असून,  त्यांनी नेतवली येथील अमित स्टोर मधून 1 किलो सुरती कोलम तांदूळ, 2 किलो गुळ, अर्धा किलो तूप आदी सामान खरेदी केले होते. आज सकाळी कार्यकर्ते तांदूळ शिजवीत होते. मात्र, कुकरच्या 10 शिट्या झाली तरी तांदूळ शिजेना. तब्बल 4 तासाने दुसरे तांदूळ आणले ते केवळ 10 मिनिट मध्ये शिजले.

तांदूळ का शिजत नाही? हा प्रश्न तेथील नागरिकांना पडला. कुकर आणि तांदूळ घेऊन बाळकृष्ण शेट्टी यांनी पालिका गाठली. मात्र, याबाबत पालिकेमध्ये तक्रार घेत नाही ठाणे मध्ये अन्न व औषध विभागात तक्रार करण्याचे सल्ले दिले. तेथे ही संपर्क साधला असता, ठाण्याला तांदूळ घेऊन या, असे उलट सल्ला दिल्याने शेट्टी यांनी संताप व्यक्त केला. अखेर पत्रकारांच्या माध्यमातून ठाण्याच्या अन्न व औषध विभागाला संपर्क साधला असता पुढील सूत्र हलली आणि तांदूळ त्यांनी ताब्यात घेतला. पुढील चौकशी सुरू झाली आहे. बनावट माव्या नंतर सदृश प्लास्टिक तांदूळ प्रकरणामुळे नागरिकामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

बुधवारी तांदूळ खरेदी केले, जुने किंवा नवीन तांदूळ 10 मिनिट मध्ये शिजते. मात्र, तब्बल चार तास लागले आहे. आता हे प्लास्टीक आहे की दुसरे मला माहित नाही. मात्र, याची चौकशी व्हावी जेणे करून सर्व सामान्य नागरिकांची फसवणूक होऊ नये, अशी माफक अपेक्षा असल्याची माहिती तक्रार दार बाळकृष्ण शेट्टी यांनी दिली.

नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कल्याण मधील यापूर्वी ही सदृश प्लास्टिक तांदळाची नमुने घेऊन तपासणी साठी पाठवली आहेत. आजच्या प्रकरणात तांदूळ ताब्यात घेतले असून, दुकानदारांच्या दुकानात ही चौकशी आणि तांदूळ नमुने घेतले आहेत. तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, अहवाल प्राप्त आल्यावर कठोर कारवाई करू, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय कडगे यांनी दिली.

Web Title: kalyan news Plastic resembling rice; Citizens confusion