कल्याण: रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे एसटीची विशेष बस सेवा

रविंद्र खरात
शनिवार, 1 जुलै 2017

कुठे धावणार बसेस 
ठाणे ते पुणे, ठाणे ते बोरीवली, ठाणे ते भाईंदर, ठाणे ते पनवेल, ठाणे ते भिंवड़ी, भिंवड़ी ते बोरीवली, भिंवड़ी ते मुंबई, भिंवड़ी ते कल्याण, कसारा ते नाशिक, कल्याण ते पनवेल, कल्याण ते अलीबाग, कल्याण ते भिंवड़ी, मुरबाड़ ते कल्याण, कल्याण ते पनवेल, वाडा ते ठाणे, वाडा ते कल्याण या मार्गावर ठाणे, भिंवड़ी, शहापुर, कल्याण, मुरबाड़, विठ्ठलवाड़ी आणि वाडा एसटी डिपो मधून प्रत्येकी 3 बसेस सोडण्यात येणार असल्याने प्रवासी वर्गाला दिलासा मिळणार आहे.

कल्याण - मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांमध्ये दुरुस्तीचे काम असताना मेगाब्लॉक घेतला जातो त्यावेळी रेल्वे सेवा बंद असल्याने कल्याण, डोंबिवली आदी परिसरामधील प्रवासी वर्गाला जाताना त्रास होतो. यावेळी रिक्षा आणि खासगी वाहन प्रवासी वर्गाकडून वाढीव भाड़े घेत असल्याने प्रवासी त्रस्त होता. त्यातून सुटका व्हावी यासाठी कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी एसटी महामंडळाकडे विशेष बससेवा सुरु करावी करण्याची मागणी केली असता एसटी महामंडळाने रविवार 2 जुलै रोजी विशेष एसटी बससेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे.

रविवारी (25 जून) ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ महत्त्वपूर्ण काम रेल्वेने केले. यावेळी सकाळी 7 दुपारी 3 या कालावधीत कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान मेगाब्लॉक जाहिर केला होता. यावेळी रिक्षा चालक आणि खासगी वाहन चालकांनी प्रवासी वर्गाकडून वाढीव भाड़े घेतल्याच्या तक्रारी कल्याण आरटीओकड़े तक्रारी केल्या होत्या. याधर्तीवर कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी एसटी महामंडळाकडे विशेष बस सोडण्याची मागणी केली असता एसटी महामंडळाने येत्या रविवार ता 2 जुलै रोजी विशेष एसटी बसेस सोड़णार असल्याचे घोषणा केली आहे.

कुठे धावणार बसेस 
ठाणे ते पुणे, ठाणे ते बोरीवली, ठाणे ते भाईंदर, ठाणे ते पनवेल, ठाणे ते भिंवड़ी, भिंवड़ी ते बोरीवली, भिंवड़ी ते मुंबई, भिंवड़ी ते कल्याण, कसारा ते नाशिक, कल्याण ते पनवेल, कल्याण ते अलीबाग, कल्याण ते भिंवड़ी, मुरबाड़ ते कल्याण, कल्याण ते पनवेल, वाडा ते ठाणे, वाडा ते कल्याण या मार्गावर ठाणे, भिंवड़ी, शहापुर, कल्याण, मुरबाड़, विठ्ठलवाड़ी आणि वाडा एसटी डिपो मधून प्रत्येकी 3 बसेस सोडण्यात येणार असल्याने प्रवासी वर्गाला दिलासा मिळणार आहे.

Web Title: Kalyan news railway mega block ST buses