...तर रिक्षा चालकांचा परवाना रद्दः आरटीओ

रविंद्र खरात
शुक्रवार, 28 जुलै 2017

कल्याणः कल्याण आरटीओ अंतर्गत येणाऱ्या शहरात राहणाऱ्या नागरिकांना आवश्यक ठिकाणी मीटरने जाण्यास रिक्षाचालकाने नकार दिल्यास महाग पडू शकते. रिक्षा चालकाविरोधात तक्रार आल्यास त्या रिक्षा चालकाला एक हजार रूपयांचा दंड भरावा लागेल, त्यासोबत त्याचे रिक्षा परवाना आणि वाहन परवाना रद्द होवू शकतो, अशी माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी 'सकाळ'ला दिली.

कल्याण आरटीओ कार्यालय अंतर्गत कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, टिटवाला, शहाड, मुरबाड ग्रामीण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरात रिक्षा शेअर पध्दतीने प्रवासी वाहतूक होते. मात्र, एखाद्या प्रवाशाला रिक्षा प्रवास मीटरने करायचा असेल तर त्या रिक्षा चालकाने तसे केले पाहिजे. मात्र, असे न करता त्या प्रवाशाकडून वाढीव भाडे घेतले जाते किंवा नाकारले जाते. यामुळे प्रवासी त्रस्त होतो. यापुढे असे चालणार नाही. कल्याण आणि डोंबिवली शहरात मीटर आणि शेअर रिक्षा स्थानक लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे.

दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी वाहन चालकांकडून मीटर प्रमाणे जाण्यास नकार देणे, ज्यादा भाडे घेणे, इच्छीत स्थळी जाण्यास नकार देणे, उद्धट वर्तन केल्यास प्रवासी वर्गाने कल्याण आरटीओ हेल्पलाइन नंबर 1800225335 या टोल फ्री नंबर वर तक्रार करू शकता, अथवा वाहन mh05autorikshawimp@gmail.com या मेल आयडीवर ही तक्रार करू शकता. कल्याण आरटीओ कार्यालय मध्ये लेखी अर्ज ही देवू शकता. तक्रारीनंतर कारवाई करण्याचे संकेत कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली. कल्याण आरटीओ कार्यालय अंतर्गत मागील अनेक वर्षांत मीटरने रिक्षा चालवत नसून आता आरटीओच्या आदेश नुसार रिक्षा चालक आणि संघटना पालन करणार का? याकडे लक्ष्य लागले आहे.

प्रति दिन आरटीओ मार्फत वाहनाची तपासणी, भाडे नाकारणे, वाढीव भाडे घेणे, प्रवाशाला इच्छीत ठिकाणी न सोडणे आदी प्रकारवर तक्रार आल्यावर कारवाई सुरु असतेच. मात्र, आता या तक्रारी मध्ये वाढ होत असल्याने त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे तक्रारी आल्यास रिक्षा चालकास एक हजार रुपये दंड आणि परवाना, लायसन्स रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.

Web Title: kalyan news rto and rikshaw passenger