विदयार्थ्यांनी प्रशासकीय सेवेतील उच्च पदासाठी प्रयन्त करावे: डॉ श्रीकांत शिंदे

रविंद्र खरात
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन सदस्य मधुकर यशवंतराव यांच्या पुढाकाराने कल्याणमधील वालधुनी शिवाजीनगर मध्ये विद्यार्थी गुण गौरव आणि जेष्ठ नागरीकांचा जाहिर सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर शिवसेना कल्याण जिल्ह्यप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दशरथ घाड़ीगावकर, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, परिवहन समिती सदस्य मधुकर यशवंतराव आदी मान्यवर उपस्थित होते.

कल्याण : विदयार्थ्यांनी केवळ डॉक्टर, इंजीनियर न बनता प्रशासकीय सेवेतील उच्च पदासाठी प्रयन्त करावे जेणे करून देशाला चांगले अधिकारी मिळतील असे प्रतिपादन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कल्याण मधील एका कार्यक्रमामध्ये केले. 

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन सदस्य मधुकर यशवंतराव यांच्या पुढाकाराने कल्याणमधील वालधुनी शिवाजीनगर मध्ये विद्यार्थी गुण गौरव आणि जेष्ठ नागरीकांचा जाहिर सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर शिवसेना कल्याण जिल्ह्यप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दशरथ घाड़ीगावकर, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, परिवहन समिती सदस्य मधुकर यशवंतराव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हणाले जेष्ठ नागरिकांनी नेहमीच शिवसेनेला आशीर्वाद दिला आहे. त्यांचा अनुभव युवा पिढीला उपयोगी ठरत आहे. त्यांचा सन्मान करणे अभिमानस्पद असल्याचे सांगत विद्यार्थी वर्गाने दहावी बारावी नंतर डॉक्टर, इंजीनियर पदवीच्या मागे न धावता प्रशासकीय पदाचा अभ्यास करावा असे आवहान खासदार शिंदे यांनी यावेळी केले. कार्यक्रम स्वर्गीय मिनाताई ठाकरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या सभागृहाची दुरावस्था पाहुन स्ट्रक्चर ऑडिट करून हॉल दुरुस्त करा किंवा पुर्नबांधणी करा. त्यात निधी लागला तर आपण देवू असे आश्वासन खासदार शिंदे यांनी यावेळी दिले.

यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर, कल्याण जिल्ह्यप्रमुख गोपाळ लांडगे, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर आदीची भाषण झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक शिवसैनिकानी ही मेहनत घेतली.

Web Title: Kalyan news Shrikant Shinde talks about student future