Kalyan News: कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; सहा जणांचा मृत्यू, मृतांमध्ये चिमुकलीचाही समावेश

Kalyan Building Slab Collapses: कल्याणमधील चिकणीपाडा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. चार मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब थेट पत्त्यासारखा तळमजल्यापर्यंत कोसळला आहे.
Kalyan Building Slab Collaps
Kalyan Building Slab CollapsESakal
Updated on

कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वमधील मंगळराघो नगर, चिकणीपाडा परिसरात मंगळवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. ‘सप्तशृंगी’ नावाच्या चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक तळमजल्यापर्यंत कोसळला. यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com