कल्याण: एसटी कर्मचारी वर्गाचा सलग दुसऱ्या दिवशी संप

रविंद्र खरात
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

ऐन दिवाळीत हाल ...
दिवाळी सुरू असून एसटी संप सुरू असल्याने काहीं प्रवाशांनी कल्याण एसटी डेपोमध्ये सलग दुसरा दिवस काढला. कारण खासगी वाहनांमधून प्रवास खिश्याला परवडणारा नव्हता  तर आता संप मिटेल या क्षणाची वाट पहात होते. तर काहींनी आपल्या नातेवाईकाकडे जाणे पसंद करत होते. दुसरीकडे खासगी वाहन चालकांनी दिवाळी चांगली साजरी केली आळेफाटा 300 रुपये तर नगर 500 ते 600 रुपये घेत प्रवाशी वर्गाकडून लूटमार केली .मात्र यात सर्व सामान्य प्रवाशी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

कल्याण : सलग दुसऱ्या दिवशी कल्याण एसटी डेपोमधील कर्मचारी वर्गाने राज्यव्यापी संपात सहभाग घेतल्याने कल्याण एसटी डेपोमधून एकही बस निघाली नाही किंवा न आल्याने लांब पल्ल्यातील आणि शहरी भागातील प्रवासी वर्गाचे हाल झाले. तर संप मोडीत काढण्यासाठी डेपो प्रशासनाने कर्मचारी वर्गाच्या विश्रांती गृहातील बाहेर गावच्या कर्मचारी वर्गाला बाहेर काढत दरवाजा बंद केल्याने कर्मचारी वर्गात संतापाचे वातावरण होते.

सोमवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला असून सलग दुसऱ्या दिवशी संप सुरू राहिल्याने कल्याण एसटी डेपोमधून एक ही बस न सुटल्याने अनेक प्रवाशांचे हाल झाले. अनेकांनी आपल्या नातेवाईकांकडे गेले तर सलग दुसऱ्या दिवशी कल्याण एसटी डेपोमध्ये दिवस काढला, तर काहींनी खासगी वाहन चालकांना वाढीव भाडे देत आपले घर गाठले. यामुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

विश्रांती गृह बंद ....
कल्याण एसटी डेपोमध्ये पहिल्या माळ्यावर एसटी कर्मचारी वर्गासाठी विश्रांती गृह आहे. सोमवार मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी वर्गाचा संप सुरू झाल्याने कल्याण बाहेरील जळगाव, साक्री, नाशिक, रावेर, नारायणगाव, भूम, नगर, शिरूर, बीड, पुणे, आदी एसटी डेपोमधील विश्रांती गृहात आराम करत होते. मात्र संप मोडीत काढण्यासाठी आज सकाळी सुरक्षा रक्षकांनी त्या कर्मचारी वर्गाला बाहेर काढत दरवाजा बंद केला. यावेळी लाईट आणि पाण्याचे कनेक्शन ही बंद केले. यामुळे कर्मचारी आणि संघटनेने या घटनेचा निषेध व्यक्त केला. आमचा काय दोष, आम्ही कुठे जायचे, आमच्याकडे हजारो रुपये आहेत ते हरवले ते कुठून भरायचे असे संताप जनक सवाल हे कर्मचारी वर्ग करत होते. यामुळे स्थानिक प्रशासन विरोधात कर्मचारी वर्गाने घोषणा बाजी दिल्याने तणावाचे वातावरण होते. दरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त असल्याने कुठलीही दुर्घटना घडली नाही. विविध संघटनांनी आजही बाहेर गावच्या स्थानिक डेपो मधील कर्मचारी वर्गाच्या जेवणाची व्यवस्था करत मदतीचा हात दिला.

ऐन दिवाळीत हाल ...
दिवाळी सुरू असून एसटी संप सुरू असल्याने काहीं प्रवाशांनी कल्याण एसटी डेपोमध्ये सलग दुसरा दिवस काढला. कारण खासगी वाहनांमधून प्रवास खिश्याला परवडणारा नव्हता  तर आता संप मिटेल या क्षणाची वाट पहात होते. तर काहींनी आपल्या नातेवाईकाकडे जाणे पसंद करत होते. दुसरीकडे खासगी वाहन चालकांनी दिवाळी चांगली साजरी केली आळेफाटा 300 रुपये तर नगर 500 ते 600 रुपये घेत प्रवाशी वर्गाकडून लूटमार केली .मात्र यात सर्व सामान्य प्रवाशी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

विविध संघटनांनी प्रवासी वर्गाची माफी मागितली ...
ऐन दिवाळीमध्ये विविध मागण्यासाठी राज्यव्यापी एसटी कर्मचारी वर्गाचा सलग दुसऱ्या दिवशी संप सुरू असल्याने प्रवाशी वर्गाचे चांगलेच हाल झाले , त्यामुळे विविध कर्मचारी संघटनांनी कल्याण डेपो मध्ये पोस्टर लावून प्रवाशी वर्गाची माफी मागत आपली समस्यां ही मांडली.

Web Title: Kalyan news ST employee strike in Kalyan