कल्याणच्या पत्रीपुलावरून शिवसेनेवर निशाणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

कल्याणमधील पत्रीपुलाचे काम रखडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन्‌ करावा लागत आहे. हाच मुद्दा उपस्थित करत मंगळवारी भाजपच्या वतीने पत्री पुलाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्य सरकार आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. पत्रीपुलाचे कामकाज केवळ भाजपला श्रेय मिळू नये म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आडमुठ्या धोरणामुळे रखडलेले आहे. त्यामुळे जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप करत भाजपने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

कल्याण : कल्याणमधील पत्रीपुलाचे काम रखडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन्‌ करावा लागत आहे. हाच मुद्दा उपस्थित करत मंगळवारी भाजपच्या वतीने पत्री पुलाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्य सरकार आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. पत्रीपुलाचे कामकाज केवळ भाजपला श्रेय मिळू नये म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आडमुठ्या धोरणामुळे रखडलेले आहे. त्यामुळे जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप करत भाजपने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

कोरोनाचा गैरसमज अन् मुंबईत मटणाची टंचाई

दरम्यान, या सर्व पार्श्‍वभूमीवर महापौर विनिता राणे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत शिवसेनेला लोकांची कामे करण्यात अधिक रस आहे; श्रेयाची लढाई आम्हाला लढायची नाही, असा खुलासा केला; तर सभागृहनेते प्रकाश पेणकर यांनी मे 2020 पर्यंत हा पूल खुला होईल अशी माहिती दिली. फेब्रुवारी 2020 मध्ये पत्री पूल नागरिकांना खुला होणार, असा फलक कल्याण पश्‍चिमेचे आमदार विश्‍वनाथ भोईर यांनी लावला होता.

प्रत्यक्षात आजही या पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज धरणे आंदोलन केले. दरम्यान, खासदार डॉ. शिंदे तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या कामाचा प्रत्यक्ष पाठपुरावा करत आहेत. या परिसरात काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे पुलाच्या कामाला थोडा उशीर होत आहे. शिवसेना सर्वसामान्यांसाठी काम करत असते, श्रेय लाटण्यासाठी काम करण्याची आमच्या पक्षाची पद्धत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 

मोबाईल आणि नोटांमुळे पसरतो कोरोना

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पत्री पुलाच्या कामाचा पाठपुरावा करत आहेत. या पुलाचे गर्डर हैदराबाद येथे तयार करण्यात आले. तेथे जाऊन शिंदे यांनी त्याची पाहणी केली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करून प्रशासनाच्या अडचणी समजावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी विषयात किती लक्ष घातले, असा सवाल सभागृह नेते प्रकाश पेणकर यांनी केला.

भाजप जे आंदोलन करत आहे ते पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले जात आहे. श्रेयासाठी ही त्यांची नौटंकी आहे, अशी टीकाही पेणकर यांनी केली. मागील पाच वर्षे कल्याण पूर्व तसेच पश्‍चिम या परिसरात भाजपचे आमदार होते. त्यांचे खासदारही या ठिकाणी होते. त्यांनी या विषयात किती लक्ष घातले, अशी विचारणाही त्यांनी केली. या पुलाच्या कामात दिरंगाई होत आहे हे मान्य करत पेणकर यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyan Patripul targets Shiv Sena