
टिटवाळा : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात आणि ग्रामस्थांच्या सहभागातून साजरा झाला. दुसरीकडे मात्र काही शाळांच्या भिंती भंगलेल्या, छप्पर गळके आणि शिक्षणाचा दर्जा ढासळल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ, गोवेली, खडवली, मामणोली, गुरवली, खोणी, दहिसर आणि सोनारपाडा या सात केंद्रांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण १३२ वर्गखोल्या आहेत. यातून २०० ते २३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; मात्र यातील सुमारे १०० वर्गखोल्या पूर्णपणे नादुरुस्त स्थितीत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.