
Dombivali: कल्याण डोंबिवलीतील 58 बेकायदा इमारत प्रकरणी कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या इमारतींना नियमित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सोसायटी नियमिती कारणासाठी आता सोसायटी धारकांनी पालिकेकडे अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत 7 इमारतींनी अर्ज दाखल केले असून यातील 2 इमारतींनी कागदपत्रे देखील सादर केली आहेत. सर्व बाबींची छाननी करण्यात येईल त्यावर पुढील प्रक्रिया पार पडेल असे नगररचना विभागाने स्पष्ट केले आहे.