कल्याण एसटी डेपो बनले मच्छीमार्केट

रविंद्र खरात 
रविवार, 10 सप्टेंबर 2017

कल्याण पश्चिमेला कल्याण रेल्वे स्थानक जवळ एसटी महामंडळाचे कल्याण एसटी डिपो असून येथून शहरी आणि ग्रामीण भागात एसटी बसेस सूटतात , येथे शहरी आणि ग्रामीण भागातुन येणारे नागरीक पाहता प्रतिदिन सकाळी 6 ते 9 या काळात बेकायदा मच्छीमार्केट भरत असल्याने सध्या एसटी डिपो चर्चेचा विषय ठरला आहे . 

कल्याण :  कल्याण पश्चिमेला कल्याण रेल्वे स्थानक जवळ एसटी महामंडळाचे कल्याण एसटी डेपो असून येथून शहरी आणि ग्रामीण भागात एसटी बसेस सूटतात , येथे शहरी आणि ग्रामीण भागातुन येणारे नागरीक पाहता प्रतिदिन सकाळी 6 ते 9 या काळात बेकायदा मच्छीमार्केट भरत असल्याने सध्या एसटी डेपो चर्चेचा विषय ठरला आहे . 

कल्याण रेल्वे स्थानक जवळ राज्याच्या एसटी महामंडळाचे कल्याण एसटी डेपो आहे , येथून कल्याण नगर , कल्याण जुन्नर -नारायणगाव , कल्याण नाशिक , कल्याण वाड़ा , कल्याण जळगाव , कल्याण पुणे , कल्याण आळेफाटा , कल्याण चिपळुन रत्नागिरी , पनवेल , भिवंडी , शहापुर , सातारा , कोल्हापुर , स्वारगेट , आदी येथून एसटी बसेस सूटत असल्याने नागरिकांची नेहमीच वर्दळ असते . दरम्यान याच एसटी डेपोमधून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन बसेस सुटतात त्या पनवेल , हाजीमलंग , वाशी ,बेलापुर , उसाटने आदी मार्गावर बसेस धावतात , तेथे प्रवासी वर्गाला क़ाय सुविधा केडीएमटी प्रशासन देते तो वादाचा मुद्दा असून तेथे काहीच सुविधा नसल्याने भर पावसात बसची वाट पाहावी लागते , काही अंतरावर तेथे एक कचरा कुंडी आहे त्याचा ही प्रवासी वर्गाला त्रास होत असतोच हा त्रास कमी होता तोच काही दिवसापासून त्या परिसर मध्ये हाजीमलंग पट्टयातील काही नागरिक सकाळी 7 ते 9 या कालावधित मच्छी विक्री करण्यासाठी येत असल्याने कल्याण इथे सध्या मच्छीमार्केट झाले.

एसटी डेपो मधून आमच्या बसेस सोडल्या जातात तेथील सुरक्षेचा प्रश्न एसटी डिपो प्रशासनाचा असून प्रवासी वर्गाच्या तक्रारीनुसार पालिकेच्या फेरीवाला विरोधी पथका मार्फ़त तेथे कारवाई केली जाईल अशी माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी दिली .

एसटी डेपो च्या बाहेर फुटपाथ वर ते मच्छी वाले आपला व्यवसाय करतात , पालिका कारवाई करते तेव्हा ते आतमध्ये येवून व्यवसाय करतात यावेळी सुरक्षा रक्षक बाहेर काढतात मात्र ते दादागिरी करतात आता पोलिस आणि पालिका यांची मदत घेवून त्या परिसर मध्ये ते बसणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी माहिती कल्याण एसटी डिपो सहाय्यक वाहतुक अधीक्षक तुकाराम सालुंखे यांनी दिली .

Web Title: Kalyan ST depot becomes Fish market esakal news