
कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनबाहेरील (Kalyan railway station) परिसर स्मार्ट सिटी (smart city) अंतर्गत विकसित करण्यात येत आहे. यात कल्याण एसटी डेपो (kalyan st depo) परिसर कसा विकसित करण्यात येईल, याचा सुधारित आराखडा कल्याण-डोंबिवली पालिकेच्या (kdmc) स्मार्ट सिटी (smart city) विभागाने राज्याच्या एसटी महामंडळाला सादर केला आहे. तो आराखडा मंजूर केल्यास स्मार्ट सिटी प्रकल्पाचा मोठा अडथळा दूर होणार असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यास स्टेशन परिसरातील मोठी वाहतूक कोंडी (traffic jam) दूर होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कल्याण स्थानक परिसर सुधारणा प्रकल्पाच्या ऑनलाईन भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २५ जानेवारी २०२१ रोजी झाले. या प्रकल्पासाठी ४९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, एसटी डेपो पालिकेकडे हस्तांतरण न झाल्याने स्मार्ट सिटी प्रकल्प रखडला होता. मात्र आता एसटी डेपोच्या जागेत नेमका कसा विकास करणार, एसटीला व्यावसायिक फायदा कसा होईल? डेपोच्या स्थलांतराचा प्रश्न कसा सोडवणार याबाबत सोमवारी (ता.७) केडीएमसीच्या स्मार्ट सिटी विभागाने राज्याच्या एसटी महामंडळाला सुधारित आराखडा सादर केला आहे. या सुधारित आराखड्यानुसार व्यापारी संकुलात ५० टक्के वाटा पालिकेने एसटी विभागाला देण्यास संमती दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे या आराखड्याला एसटी महामंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
स्टेशन परिसराचा असा होणार विकास...
- स्मार्टसिटी प्रकल्पाअंतर्गत ऑटो रिक्षा, तसेच मोटरसायकल व चारचाकी वाहने जसे कार, सिटी बस, एसटी बस यांचे वाहतूक मार्ग वेगवेगळे करण्यासाठी बैलबाजार चौक ते सुभाष चौक असा उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित आहे.
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कल्याण बस डेपोची इमारत व कार्यशाळा इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तसेच या इमारतीचे वरील मजल्यावर भव्य वाहनतळ, तसेच वाणिज्य संकुल उभारण्याचा प्रस्ताव आहे.
- कल्याण रेल्वेस्थानकामधून बाहेर पडताच नागरिकांना इच्छितस्थळी जाण्यासाठी सरकते जिने आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार आहे.
- कल्याण रेल्वे परिसरात अपुरी वाहनतळ व्यवस्था विचारात घेऊन महापालिकेच्या वाहनतळाचादेखील पुनर्विकास करण्याचे प्रस्तावित आहे. रेल्वेस्थानक परिसरात यामध्ये सुमारे २५० चारचाकी वाहने, तसेच १५०० ते २००० स्कूटर व मोटरसायकल वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
- बस डेपोलगतचा नाला बंदिस्त असून या नाल्यावर दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
- स्टेशनकडे येणारे सर्वच रस्ते स्मार्ट रस्ते म्हणून विकसित करून यावर सीसी टीव्ही यंत्रणा तसेच सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार असून सर्व परिसराचे सुशोभीकरण करण्यात प्रस्तावित आहे.
एसडी डेपोचा स्थलांतरचा प्रश्न कायम
सुधारित आराखड्याला मंजुरी दिली तरी कल्याण एसटी डेपो स्थलांतर प्रश्न अधांतरीच राहणार आहे. कारण प्रकल्पाला तीन ते चार वर्षे लागणार असून या काळात डेपोचे स्थलांतर कोठे करायचे, तसेच या काळात बुडणाऱ्या उत्पन्नाबाबत महामंडळ काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.