Why is Buddhabhoomi Foundation protesting in Kalyan
esakal
कल्याण : कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान प्रस्तावित चार पदरी उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळे हटवण्याच्या महापालिकेच्या कारवाईनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या कारवाईविरोधात बुद्धभूमी फाउंडेशनने तीव्र आक्षेप नोंदवत आंदोलन सुरू केले असून, कोणतीही पूर्वसूचना न देता अन्यायकारक पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप केला आहे.