

Dream Realised After 2.5 Years of Hard Work; 18-Year-Old from Kalyan Shines
Sakal
कल्याण : कल्याण पूर्वेतील तरुण कार्तिक गीते याची वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी भारतीय नौदलात क्लास-१ अधिकारी सबलेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे. पुढील चार वर्षे तो आयएनएमध्ये कठोर प्रशिक्षण घेणार असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची नियुक्ती भारतीय नौदलात सब-लेफ्टनंट (क्लास–ए अधिकारी) पदावर होणार आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कल्याण शहरासह सर्वच स्तरावरुन कार्तिकचे अभिनंदन करण्यात येत आहे.