
डोंबिवली : मलंगगड जवळील कुशवली येथे पहाटेच्या सुमारास एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. किरण परब असे मृत तरुणाचे नाव असून कल्याण पूर्वेत हा तरुण रहात होता. कर्जबाजारी झाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात असून ऑनलाईन गेममुळे तो कर्जबाजारी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनेची हिललाईन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. किरण सोबत त्याचा मोबाईल देखील जळून खाक झाल्याने त्याने नक्की आत्महत्या कशासाठी केली याचा शोध पोलीस घेत आहेत.