कमला मिल आग प्रकरणी मोजोसच्या युग तुलीला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

युगला आज (ता.16) न्यायालयात हजर करण्याचा शक्यता आहे. कमला मिल कंपाऊडध्ये 29 डिसेंबरला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी वन-अबाव्ह पब आणि मोजोसपबवर गुन्हा नोंदवला होता. अग्ऩिशमन दलाने सादर केलेल्या अहवालानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली.

मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस ब्रेस्टोचा मालक युग तुलीला अटक करण्यात पोलिसांना य़श आले आहे. या पूर्वी पोलिसांनी युगचा जबाब देखील नोंदवला होता.

युगला आज (ता.16) न्यायालयात हजर करण्याचा शक्यता आहे. कमला मिल कंपाऊडध्ये 29 डिसेंबरला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी वन-अबाव्ह पब आणि मोजोसपबवर गुन्हा नोंदवला होता.

अग्ऩिशमन दलाने सादर केलेल्या अहवालानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. आग सर्व प्रथम मोजोसला लागल्याचे अहवालात म्हटल्यानंतर पोलिसांनी युग पाठक आणि युग तुलीला अटक करण्यासाठी विशेष पथक पाठवली. 7 जानेवारीला पोलिसांनी युग पाठकला अटक केली. माञ अटक टाळण्यासाठी युग तुली पोलिसांपासून पळ काढत होता. अखेर युगला मंगळवारा सकाळी अटक करण्यात ना. म. जोशी मार्ग पोलिसांना यश आले. युगला कुठून अटक केली याबाबत पोलिस कमालीची गुप्तता बाळगत आहे. युग स्वतःहून पोलिसांना शरण आल्याचे ही चर्चा आहे.

Web Title: Kamala Mills Fire Mojos Bistro Co owner Yug Tuli Surrenders