esakal | कांदिवली : स्कायवॉकवर भिकाऱ्यांचा अड्डा
sakal

बोलून बातमी शोधा

kandivali

कांदिवली : स्कायवॉकवर भिकाऱ्यांचा अड्डा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कांदिवली : कांदिवली पूर्वेला रेल्‍वे स्‍थानक ते द्रुतगती मार्गापर्यंत सुमारे एक किलोमीटरचा स्कायवॉक आहे. हा स्कायवॉक भिकाऱ्यांचा अड्डा झाला असून पादचाऱ्यांना चालणेही अवघड झाले आहे. भिकाऱ्यांमुळे येथे पहाटे आणि रात्रीच्‍या वेळेस जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागते.

पूर्वेकडे आकुर्ली हा एकमेव मार्ग असून तो अरुंद आहे. येथे फेरीवाल्यांनी पदपथांवर अतिक्रमण केले आहे. त्‍यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होण्‍यासाठी बहुतांश प्रवासी स्‍कायवॉकचा वापर करतात. एमएमआरडीए विभागाने स्कायवॉक मुंबई पालिकेच्या ताब्यात दिला आहे. त्‍यामुळे संपूर्ण जबाबदारी पालिकेची आहे. भिक्षेकऱ्यांनी स्‍कायवॉकचा वापर झोपण्याकरिता सुरू केला आहे. त्यामुळे या पुलावर दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्याचप्रमाणे गर्दुल्ले व प्रेमीयुगुलांनीही ठाण मांडले आहे.

हेही वाचा: आयटी धोरणासाठी संकल्पना द्या : राज्यमंत्री सतेज पाटील

सध्‍या सरकता जिना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील, असे आश्‍‍वासन सहायक आयुक्त आर/दक्षिण विभागाच्‍या संध्या नांदेडकर यांनी दिले. तसेच सहायक आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना सरकता जिना सुरू करण्यासाठी तसेच भिकाऱ्यांवर योग्य कारवाई करून सुरक्षिततेसाठी लक्ष घालण्याची मागणी केल्‍याचे प्रभाग समिती अध्यक्षा लीना देहेरकर यांनी सांगितले.

सरकते जिने बंद

स्कायवॉकला सुरुवातीला व शेवटी दोन सरकते जिने आहेत; मात्र गेली कित्येक महिने ते बंद आहेत. या पुलावरून दिवस-रात्र नागरिक प्रवास करत असतात. पुलाची साफसफाई होत नसल्याने सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

loading image
go to top