मालाड : वनविभागातील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यास वनविभागाची सहमती | Sanjay Gandhi National Park | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply

मालाड : वनविभागातील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यास वनविभागाची सहमती

मालाड : कांदिवली पूर्वेला (Kandivali) वन विभागाच्या (Forest area) हद्दीत असणाऱ्या वस्त्यांना पाणीपुरवठा (water supply in society) करणाऱ्या जलवाहिनीला वन विभागामार्फत एनओसी (NOC) मिळाली असून लवकरच येथील राहिवाशांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. ९ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. माजी प्रभाग समिती अध्यक्षा, नगरसेविका प्रीतमताई पंडागळे (preetamtai pandagale) यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi national park) मुख्य वनरक्षक संचालक मल्लिकार्जुन यांची भेट घेतली व वन विभागातील भीमनगर, रामगड, गौतमनगर, लहुगड येथील स्थानिक रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा केली.

हेही वाचा: परबांना शंभर कोटी मिळाल्यास एसटीचे विलीनीकरण करतील; प्रसाद लाड यांचा टोला

चर्चेत सहा इंची पाईपलाईन, शौचालये दुरुस्थीबाबत वन अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली.
येथील नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही रेंगाळत आहे. काहींचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी बहुतांशी रहिवासी अजूनही घरांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र तोपर्यंत येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, या हेतूने ही भेट घेण्यात आली असल्याचे नगरसेविका प्रीतमताई पंडागळे यांनी सांगितले. पाणी आणि शौचालयांच्या मागणीची वन अधिकाऱ्यांनी दाखल घेतली आहे, असेही त्या म्हणाल्या. या वेळी राकेश चव्हाथे, आशा जाधव, मयूर पंडागळे, अविनाश राय, नीलेश पुजारी, सुनील शिंदे, रामचंद्र यादव, लक्ष्मण कांबळे आदी उपस्थित होते.

loading image
go to top