कंगना राणावत यांचा पद्मश्री पुरस्कार रद्द करा; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी | Dr Neelam Gorhe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress kangana ranaut

कंगना रणौतची पद्मश्री रद्द करा; शिवसेनेच्या मोठ्या नेत्याची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सतत बेफाम वक्तव्यामुळे प्रसिद्ध असलेली पद्मश्री अभिनेत्री कंगना रणौत (Kangana ranaut) यांनी पुन्हा अकलेचे तारे तोडले आहेत. रणौत यांनी भारतीय स्वातंत्र्यावरच (Indian Freedom) भाष्य केलंय! (controversial statement) "१९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे भीक मागून मिळाले होते, भारताला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले" असं म्हटलं आहे. याबाबत शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला असून मा. राष्ट्रपती महोदय यांच्या त्यांचा पद्मश्री पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: कंगणा राणावत विरोधात तक्रार; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुढे बोलताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, राणावत यांनी अतिशय बेजबाबदार, निराधार, स्वातंत्र्य योध्याचे अपमान करणारे हे त्याचे विधान असून त्याचा जाहीर निषेध केला आहे. प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असलेली त्याच्यासाठी बेताल वक्तव्य करणारी रणौत ही अभिनेत्री आहे.

loading image
go to top