esakal | कंगनाचे पुन्हा ट्विट्स, संजय राऊत-कुणाल कामराच्या फोटोवर खोचक टिप्पणी 
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut tweet sanjay raut kunal kamra photo mumbai power cut

कंगनाचे ट्विट्स कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकताच एक शो शूट केला आहे. त्या शोमधल्या एका फोटो वर कंगनाने कमेंट केली.

कंगनाचे पुन्हा ट्विट्स, संजय राऊत-कुणाल कामराच्या फोटोवर खोचक टिप्पणी 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने पुन्हा एकदा ट्विट करून, महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईत आज सकाळी खंडीत झालेल्या वीज पुरवठ्यावरही कंगनानं खोचक टिप्पणी केलीय. 

आणखी वाचा - मुंबई बत्ती गुल; हॉस्पिटल्सना इंधन पुरवण्याचे आदेश

काय म्हणाली कंगना? 
कंगनाचे ट्विट्स कायमच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकताच एक शो शूट केला आहे. त्या शोमधल्या एका फोटो वर कंगनाने कमेंट केली असून, या फोटोच्या माध्यमातून माझ्यावर झालेली कारवाई अन्यायकारण आणि बेकायदेशीर होती. हे सिद्ध होतंय, असा दावा तिनं केलाय. खासदार राऊत आणि कुणा कामरा यांनी फोटोमध्ये खेळण्यातील जेसीबी हातात घेतला आहे. त्यावरूनच कंगनाने ट्विट करत पुन्हा खद् खद् व्यक्त केलीय. कंगनानं म्हटलंय की, मला खूप छळ सहन करावा लागला, आर्थिक नुकसान झालं, मानसिक छळ झाला. पण, महाराष्ट्र सरकारची अकार्यक्षमता उघड्यावर पडली आहे. माझ्या ऑफिसचे बांधकाम बेकायदेशीरपणे पाडलंय. हेच यावरून सिद्ध होतंय. 


सरकार कंगना कंगना करतंय
मुंबईत आज, वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे लोकल सेवा ठप्प पडली असून, रुग्णालयांमध्येही पेशंट्सचे हाल सुरू आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कंगनाने पुन्हा संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचा फोटो शेअर करत. मुंबईत वीज गेलीय आणि राज्य सरकार कंगना कंगना करत बसलंय, असा टोला कंगनाने लगावलाय.