कंगना राणावत आज राज्यपालांची घेणार भेट, वाचा सविस्तर

पूजा विचारे
Sunday, 13 September 2020

अभिनेत्री कंगना राणावत आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. दुपारी ४.३० च्या सुमारास ही भेट होणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे.

मुंबईः अभिनेत्री कंगना राणावत आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. दुपारी ४.३० च्या सुमारास ही भेट होणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. या कारवाईनंतर कंगनानं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर शिवसेनेनं कंगनावर टीका केली. 

राज्यपाल नाराज 

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता यांच्याकडे राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांनी कंगना प्रकरणाची अयोग्य पद्धतीनं हाताळणी केली असल्याची म्हणत राज्यपालांनी मेहता यांच्याकडे आपली नाराजी बोलून दाखवली.  मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई ही घाईघाईनं घेतली असल्याचं राज्यपालांनी म्हटलं होतं. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्य नव्हती. कंगनानं राज्य सरकारविरोधात वक्तव्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली, असं राज्यपाल मेहता यांच्याकडे म्हणाले होते. 

अधिक वाचाः  KEM हॉस्पिटल व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मुख्य आरोपीला अटक
 

ड्रग्ससंदर्भात मुंबई पोलिस करणार कंगनाची चौकशी

कंगनाची ड्रग्स संदर्भात चौकशी होणार आहे. मुंबई पोलिसांना कंगनाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आदेशानंतर मुंबई पोलिस कंगनाचा ड्रग्सशी काही संबंध आहे का याची चौकशी करणार आहे. काही दिवसांपूर्वी ड्रग्ससंदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. 

अधिक वाचाः  कोविडचा रिकव्हरी रेट घटला, ११ दिवसात २ टक्क्यांनी घट

कंगनाची ड्रग्स प्रकरणाशी काही संबंध आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले होते. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी कंगना विरुद्ध अंमली पदार्थांच्या दुव्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. 

Kangana Ranaut will meet Governor Bhagat Singh Koshyari today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut will meet Governor Bhagat Singh Koshyari today