कंगनाला नुकसान भरपाई मिळावी; रामदास आठवलेंची राज्यपालांकडे मागणी 

मिलिंद तांबे
Friday, 11 September 2020

 मुंबई पालिकेने अभिनेत्री कंगना राणौततच्या कार्यालयावर 24 तासांची नोटीस देऊन तोडक कारवाई केली. पालिकेने नियमांचे उल्लंघन करून ही कारवाई केली आहे.

मुंबई :  मुंबई पालिकेने अभिनेत्री कंगना राणौततच्या कार्यालयावर 24 तासांची नोटीस देऊन तोडक कारवाई केली. पालिकेने नियमांचे उल्लंघन करून ही कारवाई केली आहे. त्यामुळे कंगनाला नुकसान भरपाई मिळायला हवी. तसेच, ज्या अधिकाऱ्यांनी हि कारवाई केली त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत त्यांच्याकडे केली.  

कंगनाकडून पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा, शेअर केला बाळासाहेबांचा 'तो' व्हिडिओ

कोरोनाला रोखण्यास महाविकास आघाडी सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाविरोधात कठोर पावले उचलावीत, असे आदेश भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला  द्यावेत, असेही निवेदन आठवले यांनी दिले. दरम्यान, कंगना राणौतच्या समर्थनार्थ रामदास आठवले मैदानात उतरले असून त्यांनी कंगनाचीही भेट घेतली आहे. 

डॉक्टरांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; सरकारच्या धोरणांबाबत व्यक्त केला तीव्र संताप

याशिवाय कॅप्टन दीपक साठे यांचा कोझिकोड येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी जीवाची पर्वा न करता अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले. त्यामुळे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र् भूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana should get compensation Ramdas Athavales demand to the Governor