कंगनाला BMCने धाडली नोटीस; 24 तासात कागदपत्र सादर करण्याचे आदेश 

कंगनाला BMCने धाडली नोटीस; 24 तासात कागदपत्र सादर करण्याचे आदेश 

मुंबई : अभिनेत्री कंगणा राणावत हिच्या पालिहील येथील बंगल्यातील कथित बेकायदा बांधकामाबाबत महापालिकेने आज नोटीस पाठवली आहे.तीच्या कर्मचार्यांनी ही नोटीस स्विकारण्यास नकार दिल्यानंतर पालिकेच्या पथकाने नोटीस भिंतीवर डकवली आहे.24 तासात बंगल्यामध्ये सुरु असलेल्या कामाच्या परवानगीचे कागदपत्र सादर करण्याची मुदत कंगणाला देण्यात आली आहे. कंगणाने 24 तासात पुरावे सादर न केल्यास पालिका हे बांधकाम बेकायदेशीर ठरवून तोडू शकते.

महापालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयाकडे 2018 मध्ये कंगणाच्या बंगल्या बाबत तक्रार आली होती.त्यानंतर पालिकाने कंगणाला नोटीसही पाठवली होती.या नोटीसला कंगणाने दिडोशी न्यायालयात आव्हान दिले असून न्यायालयाने तेव्हा पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे.तर,कंगणाच्या बंगल्यात कार्यालय तयार करण्याचे काम सुरु होते.महापालिकेच्या एच पश्चिम प्रभागाच्या इमारत कारखाने विभागाच्या पथकाने या बंगल्याला सोमवारी भेट देऊन पुन्हा पाहाणी केली. त्यानंतर आज पुन्हा सुधारित नोटीस पाठविण्यात आली आहे. या बंगल्यामध्ये चटई क्षेत्र नियमांचे उल्लेघन करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.काही ठिकाणी वाढीव बंाधकामही करण्यात आल्या आले.तर पुर्वीची दोन बांधकाम जोडण्यात आली आहेत.तसेच अंतर्गत बदलही करण्यात आले आहेत.यात टॉयलेट तोडून त्या जागी कार्यालय बांधण्यात आले आहे.तसेच परवानगी न घेता नवे टॉयलेट बांधण्यात आले आहे.असे प्रथम दर्शिनी दिसत आहे.

या बंगल्यात काही बेकायदा बदल झाल्याचे तसेच बेकायदेशीर रित्या वाढिव कायद्याचे उल्लंघन करुन नियमबाह्य चटई क्षेत्र वापरण्यात आल्याचे दिसत आहे.त्यामुळे 24 तासात सर्व कागदपत्र सादर न केल्यास पालिकेकडून बेकायदा बांधकाम हटविण्याची कारवाई केली जाईल असे पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com