कंगनाच्या विमानात सुरक्षा नियमांचा बोजवारा; नागरी उड्डयण विभागाने इंडिगोकडे अहवाल मागितला 

विनोद राऊत
Saturday, 12 September 2020

प्रवासादरम्यान कंगनाची प्रतिक्रिया घेण्याच्या नादात पत्रकारांनी सोशल डिस्टंसिंग आणि विमान सुरक्षेच्या नियमाचे उल्लघंन केल्याचे समोर आले आहे.

मुंबई : कंगना रनौतवरून रोज नवनवीन वाद निर्माण होत आहे. आता कंगना रनौत ज्या इंडिगो विमानाने मुंबईत दाखल झाली त्यात प्रवासादरम्यान कंगनाची प्रतिक्रिया घेण्याच्या नादात पत्रकारांनी सोशल डिस्टंसिंग आणि विमान सुरक्षेच्या नियमाचे उल्लघंन केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नागरी उड्डयण संचानलयाने या प्रकाराबद्दल इंडीगोकडून अहवाल मागवला आहे. 

मुख्यमंत्र्यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून माजी नौदल अधिकाऱ्यांना शिवसैनिकांची बेदम मारहाण; कठोर कारवाईची भाजपची मागणी

कंगना रनौत आणि तीची बहीण रंगोली 9 सप्टेंबररोजी इंडीगोच्या विमानाने मुंबईत दाखल झाली. याच विमानात कंगना रनौतच्या  कव्हरेजसाठी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे पत्रकारही प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कंगनाची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. या प्रयत्नात सोशल डिस्टसिंग आणि विमान सुरक्षा नियमांचे उल्लघंन झाले. या पत्रकारांना विमान सेवा कर्मचाऱ्यांनी आपआपल्या जागेवर बसण्याची विनंती केली. मात्र, पत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. विमान प्रवासादरम्यान  मोबाईल कॅमेरा वापरण्यावर बंदी आहे. पत्रकार मोबाईल कॅमेऱ्याने कंगनाचे चित्रीकरण करत होते. या प्रवासात कंगनाने एकही प्रतिक्रीया दिली नाही. विमानातील अन्य प्रवाशांनी या प्रकाराचे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल केल्याने हा प्रकार समोर आला. तर, काही जणांनी नागरी उड्डयण विभागाकडे तक्रारी केल्याची माहिती आहे.

आरक्षणविरोधी कंगनाला पाठींबा का? आठवलेंच्या भूमिकेवर रिपाई नेत्याने दिला राजीनामा

या संदर्भात इडींगोकडे आम्ही विस्तृत अहवाल मागवला असल्याचे नागरी उड्डयण संचानलयाचे प्रमुख जनरल अरुण कुमार यांनी सांगीतले. अहवाल आल्यावर कारवाई करु, असेही ते म्हणाले. मात्र इंडीगो एयलाईन्सने आमच्या कर्मचाऱ्यांनी सर्व  नियम पाळल्याचा दावा केला. या संदर्भात वांरवार उद्घोषणा केल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
यापुर्वी इंडीगो एयरलाईन्सच्या विमानात स्टँड अप कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी पत्रकार अर्नब गोस्वामी याला प्रश्न विचारले होते. विमान सुरक्षेचे नियमाचे उल्लघंन केल्याप्रकरणी कुणाल कामरावर कारवाई करण्यात आली होती. कामरावर सहा महिन्यांसाठी विमान प्रवास बंदी करण्यात आली होती. नागरी उड्डयण मंत्री हरदिप पुरी यांनी या संदर्भात कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या प्रकरणात ते आता काय भूमिका घेतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kanganas flight safety regulations The Civil Aviation Department requested a report from Indigo