कराची बेकरीचे मालक फाळणीतील हिंसेचे बळी; मनसेच्या नोटीशीला दिले उत्तर

तुषार सोनवणे
Saturday, 28 November 2020

स्थानिक मनसे नेत्यानेही बेकरीच्या मालकाला कायदेशीर नोटीस पाठवली होती. या नोटीशीला बेकरीच्या मालकाने उत्तर दिले आहे. 

मुंबई - शहरातील वांद्रे परिसरातील कराची बेकरीच्या नावाला शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. स्थानिक मनसे नेत्यानेही बेकरीच्या मालकाला कायदेशीर नोटीस पाठवली होती. या नोटीशीला बेकरीच्या मालकाने उत्तर दिले आहे. 

हेही वाचा - आमची राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी नाही पण... ! देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

बेकरीची स्थापना पाकिस्तानातून विस्थापित होऊन भारतात आलेल्या एका सिंधी-हिंदू परिवाराने केली होती. कराची बेकरीचा ब्रॅंड मुंबईसह दुरवर पर्यंत  पोहचला आहे. त्यामुळे भारतीयांच्या भावना दुखवण्यासाठी तर या नावाचा वापर केला गेला नाही ना. असा आक्षेप लोकांनी घेतला होता. बेकरीचे संस्थापक खानचंद रमानी हे फाळणीदरम्यान पाकिस्तानच्या समर्थकांकडून करण्यात आलेल्या हिंसेचे बळी ठरले होते, त्यानंतर त्यांनी मुंबईतील आपल्या विस्तापित ठिकाणी या बेकरीचे नाव कराची ठेवले असे आहे. अशी माहिती बेकरी मालकाने नोटीशीला उत्तर देताना केली आहे.

कराची बेकरी हे नाव भारतीयांच्या भावना दुखवणारं आहे. त्यामुळे बेकरीचं नाव बदलण्यात यावं आणि साईन बोर्डही मराठीत असावं अशी मागणी स्थानिक मनसे नेते हाजी सैफ शेक यांनी केली होती. त्यांनीच बेकरी मालकाला कायदेशीर नोटीस पाठवली होती. 

हेही वाचा - फडणवीसांना राऊतांचं जशास तसं उत्तर; "सगळ्यांच्या कुंडल्या मी घेऊन बसलो आहे" वक्तव्याची करून दिली आठवण

बेकरीच्या मालकाने दिलेल्या उत्तरात असंही सांगण्यात आलं आहे की, "पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हिंसेचे बळी ठरल्याने त्यांच्याकडून भारतीयांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य करण्यात येणार नाही. बेकरीच्या संस्थापकांनी कराची हे नाव देऊन भारतीय सैन्यांप्रती असन्मान दर्शवला आहे असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे बेकरी संस्थापकांच्या भारत निष्ठेवर जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत ते चुकीचे आहेत."

Karachi bakery owners victims of partition violence Responded to MNS notice 

-------------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karachi bakery owners victims of partition violence Responded to MNS notice