esakal | करिश्मा प्रकाशच्या घरात सापडलेत ड्रग्स, NCB कडून करिश्माला पुन्हा समन्स
sakal

बोलून बातमी शोधा

करिश्मा प्रकाशच्या घरात सापडलेत ड्रग्स, NCB कडून करिश्माला पुन्हा समन्स

यापूर्वी करिश्मा आणि  दिपिका पदुकोण यांच्यातील एक संशयीत चॅटही एनसीबीच्या हाती लागला होता.

करिश्मा प्रकाशच्या घरात सापडलेत ड्रग्स, NCB कडून करिश्माला पुन्हा समन्स

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : अभिनेत्री दिपीका पदुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरात केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाला (NCB) अंमली पदार्थ सापडले असून याप्रकरणी तिला बुधवारी चौकशीला बोलावण्यात आले आहे. 

एनसीबीने मंगळवारी करिश्माच्या वर्सोवा येथील घरात शोध मोहिम राबवली होती. तेव्हा त्यांना अंमली पदार्थ सापडले. कमी प्रमाणात हे ड्रग्स असल्यामुळे तिला समन्स पाठवून चौकशीसाटी बुधवारी  कार्यालयात येण्यास सांगण्यात आले आहे.

महत्त्वाची बातमी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता; BMC कडून 50 हजार खाटांची तयारी 

रिया चक्रवर्तीला अटक केलेल्या गुन्ह्यात (NCB) एनसीबीने एका ड्रग्स पेडलरला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर करिश्माच्या घरी शोध मोहिम राबवण्यात आली. त्यावेळी ती घरी उपस्थित नव्हती.

यापूर्वी करिश्मा आणि  दिपिका पदुकोण यांच्यातील एक संशयीत चॅटही एनसीबीच्या हाती लागला होता. करिष्मा प्रकाशसोबत 2017 मध्ये झालेल्या चॅटवरून एनसीबीने दिपीकाची पाच तास चौकशी केली होती. त्यावेळी दिपीकाने 2017 मधील हे चॅट आपलेच असल्याचे मान्य केले. मात्र ड्रग्स सेवनाच्या आरोपांना नकार दिला. त्यात माल आणि हॅश हे सिगरेटसाठी सांकेतिक शब्द असल्याचे तिने स्पष्ट केले.

हेही वाचा - कंगनाच्या अडचणी वाढणार? कंगनावर कारवाईसाठी वकिलांचे महाधिवक्त्यांना पत्र

एनसीबीने याप्रकरणी तिचा मोबाईल जप्त केला होता. तो न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.  बँक खात्याची गेल्या तीन वर्षातील व्यवहार तसेच इतर व्यवहारांची तपासणी करण्यास एनसीबीने सुरुवात केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

Karishma Prakash Deepika Padukones Manager Summoned By Narcotic Control Bureau

loading image