
कैलास म्हामले
कर्जत : काही दिवसांपूर्वी भिवंडी येथे एका स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार घडला होता. यामध्ये दोन महिलांचे फोटो लिंबांवर चिटकवून ते काळ्या कपड्यांमध्ये गुंडाळले होते. हा प्रकार समोर येताच घटनेची माहिती स्थानिकांनी गावातील पोलीस पाटील यांना दिल्यानंतर याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे.