esakal | कर्जत-माथेरान मिडी बससेवा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कर्जत-माथेरान मिडी बससेवा सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माथेरान (Matheran) नगरपालिकेच्या मागणीवरून सुरू करण्यात आलेली कर्जत ते माथेरान मिडी बस सेवा टाळेबंदीमुळे काहीच महिन्यांत बंद पडली. त्यांनतर आता तब्बल दीड वर्षांनंतर माथेरानच्या (Matheran) पर्यटकांसाठी (Tourist) आणि स्थानिकांसह शालेय विद्यार्थ्यांसाठी फायद्याची ठरणारी ही मिडी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

कर्जतहून ही बस सुटून नेरळ रेल्वेस्थानकातून माथेरान येथील अमन लॉजपर्यंत धावणार आहे. सुटीच्या दिवसात पर्यटन करून त्याच दिवशी परतण्याचा प्लॅन असल्यास मुंबईकर नक्कीच माथेरानच्या पर्यटनाचा पर्याय निवडतात. माथेरान-मुंबई, पुण्यातील स्थानिकांमध्ये सर्वात जवळच सहलीचे ठिकाण आहे. साधारण २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले असून संपूर्ण डोंगरमाथा माथा, जैवविविधता तसेच घनदाट झाडी नवदुर्गा आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे.

हेही वाचा: निसर्गरम्य सिंहगडावर वसलंय नवं रिसोर्ट; पाहा फोटो

या निसर्गरम्य पर्यटनस्थळी एसटीची कर्जत आणि नेरळ (खांदा) येथून थेट मिडी बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. संध्या माथेरान पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी खासगी प्रवासी वाहतुकीची सेवा नेरळ स्थानकावरून उपलब्ध आहे.

नेरळ ते अमन लॉज माथेरानपर्यंत प्रतिप्रवासी १०० रुपये तिकीट घेतले जाते. मात्र, एसटी महामंडळाच्या बसमधून अवघ्या २५ रुपयांमध्ये अमन लॉजपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळेच स्थानिक आणि पर्यटकांची आर्थिक लूट थांबणार असून, मिळणार आहे.

loading image
go to top