नेरळमधील हाणामारीप्रकरणी 25 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

कर्जत - नेरळ प्रीमियर लीगच्या सामन्यात पेनल्टीच्या कारणावरून दोन संघांत रविवारी (ता. 17) झालेल्या तुंबळ हाणामारीप्रकरणी आज पोलिसांनी दोन्ही गटांतील 25 जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या हाणामारीत बॅट, स्टम्प व धारदार शस्त्राने हल्ला केल्याने अनेक जण जखमी झाले होते. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही गटांतील आरोपींना ताब्यात घेतले होते.
Web Title: karjat mumbai news 25 arrested in fighting case