

Panvel-Karjat Railway Line
ESakal
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : कर्जत आणि परिसरातील प्रवाशांसाठी मुंबईकडे जाणारा नवा मार्ग लवकरच खुला होण्याची शक्यता आहे. पनवेल-कर्जत नव्या उपनगरीय रेल्वे मार्गिकेचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, वर्षअखेरीस ही मार्गिका रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीआरएस) तपासणीसाठी तयार करण्याचे नियोजन आहे. मार्गिका सुरू झाल्यानंतर कर्जत परिसरातील नागरिकांना पनवेलमार्गे नवी मुंबईकडे प्रवास करता येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकडे जाण्यासाठी कल्याणमार्गे करावा लागणारा वळसा कमी होऊन प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.