कर्जत, नेरळला दणका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मुंबई : कर्जत शहरात उल्हास नदीला पूर आला होता. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारी पहाटेपासून उल्हास नदीच्या पाण्याने धोक्‍याची पातळी ओलांडली. उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या शनि मंदिरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते.

मुंबई : कर्जत शहरात उल्हास नदीला पूर आला होता. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारी पहाटेपासून उल्हास नदीच्या पाण्याने धोक्‍याची पातळी ओलांडली. उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या शनि मंदिरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. बामचा मळा परिसरही पाण्याखाली गेला होता. उल्हास नदी दुथडी वाहत असल्याने नदीच्या तीरावर असलेल्या गावाला पाण्याने वेढले होते. वावे, बार्डी आणि बेडसे भागातदेखील पाणी शिरले होते. 

कोल्हारे गावातील नदीकडेला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले होते. धामोते गावातील उल्हास नदीची उपनदी असलेल्या नदीच्या बाजूला असलेल्या घरात पाणी शिरले आहे. उल्हास नदीवरील मालेगाव-दहिवली पूल पाण्याखाली गेला होता. शेलू आणि बंधिवली भागातील चाळींमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरले. नेरळ गावात यावर्षी पहिल्यांदा महापुराने अनेक भागांना बाधित केले. मातोश्रीनगर, शिंदेवाडी, निर्माणनगरी, गंगानगर, चंचे चाळ, या पूर्व भागातील रहिवासी भागात घरांमध्ये पाणी शिरले आहे.

नेरळ बाजारपेठ भागात सम्राटनगर, सहयोग सोसायटी, हेटकरआळी, राही हॉटेल या सखल भागांत घरांमध्ये पाणी शिरले आहे. कल्याण रस्त्यालगत असलेल्या गजानन महाराज मंदिर भागातदेखील पुराचे पाणी लोकवस्तीमधून वाहत होते. नेरळ-कर्जत रस्त्यावर माणगाव येथे असलेल्या एस्सार पेट्रोल पंप परिसर येथेदेखील पावसाचे पाणी शिरले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karjat, Nerul rain