Karjat News : रेल्वे वाहतुकीचे वाजले तीन तेरा! कर्जत स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, प्रवाशांचे प्रचंड हाल

मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातील सिग्नल यंत्रणे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन-तेरा वाजले.
Railway Signal
Railway Signalsakal

मुंबई - मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातील सिग्नल यंत्रणे झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन-तेरा वाजले. त्यामुळे सणासुदीच्या दिवशी कामावरून घरी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ३०) संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कर्जत स्थानकातील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सिग्नल यंत्रणा पुर्णपणे ठप्प पडली होती. त्यामुळे कर्जत- सीएसएमटी दरम्यानची लोकल वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली.

परिणामी लोकलच्या एका मागोमाग एक रांगा लागल्याने गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे लोकल गाड्यामध्ये प्रवासी अडकून पडले होते. या घटनेची माहितीने मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटना स्थळी दाखल झाले. अर्धात तासात सिग्नल बिघाड दुरुस्त करण्यात आलेला आहे.

मात्र ही घटना पीकअवर्स मध्ये घडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहे. लोकलमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांनी खाली उतरुन रुळामधून चालत जाऊन जवळचे स्थानक गाठत असल्याचे चित्रही दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com