
मोहिनी जाधव
बदलापूर : सकाळी गर्दीच्या वेळेत कामावर जाण्याची घाई असताना, मध्य रेल्वेचा पुन्हा एकदा खोळंबा झाल्यामुळे बदलापूरकरांना लोकल पकडण्यासाठी जीवघेणा स्टंट करावा लागला. सकाळीच कर्जत कडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या लोकल २५ ते ३० मिनिट उशिराने धावत असल्यामुळे, फलाट क्रमांक तीनवर गर्दीचा महापूर लोटला होता. त्यामुळे लोकलमध्ये चढायला मिळावे यासाठी अनेक प्रवासी रेल्वे रुळावर उतरून, विरुद्ध दिशेने लोकल पकडण्यासाठी जीव धोक्यात घालत होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात होत असलेली गर्दी लक्षात घेत, यावर तातडीने उपाय करण्याची मागणी संतप्त बदलापूर रेल्वे प्रवासी करत आहेत.