esakal | नरेंद्र पाठक यांना कर्मवीर आदर्श शिक्षक पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नरेंद्र पाठक यांना कर्मवीर आदर्श शिक्षक पुरस्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) महाविद्यालयाच्या ३७ व्या वर्धापन दिनाचे आणि शिक्षक दिनाचे (Teacher Day) औचित्य साधून कर्मवीर आदर्श शिक्षक (Ideal Teacher) पुरस्कार (Award) सोहळा आयोजित करण्यात आला होता.

बुधवारी पार पडलेल्या या सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कारविजेते नरेंद्र पाठक (Narendra Pathak) यांना कर्मवीर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमुख अतिथी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ (Ashok Samel) यांच्या हस्ते पाठक यांना सन्मानपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली.

हेही वाचा: श्री रेणुका माता मंदिराचे काम प्रगतीपथावर; भक्तांनी सढळ हाताने मदत करावी असे विश्वस्त मंडळाचे आवाहन

या वेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे, उपाध्यक्ष व नगरसेवक मनोज शिंदे, सचिव संतोष शिंदे, भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय पत्की, केबीपी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संतोष गावडे आदी उपस्थित होते.

loading image
go to top