कर्नाळा सहकारी बँक घोटाळा ; विवेक पाटलांसह ७६ जणांवर गुन्हा दाखल...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

नवी मुंबई - कर्नाळा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ७६ जणांवर पनवेल शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शेकाप नेते, माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर देखील गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याचसोबत संचालक मंडळावर असणाऱ्या १४ सदस्यांवर देखील गुन्ह्याची नोंद झाली आहे.  तब्ब्ल ६३ जणांच्या खात्यावर बनावट कागदपत्र सादर करून ५१३ कोटींच्यावर कर्ज काढण्यात आलीत असे आरोप केले जातायत. या ६३ जणांवरदेखील गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. यातील अनेकजण हे शेकाप पक्षाचे पदाधिकारी आहेत.  

मोठी बातमी - उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज

पैसे मिळत नसल्याने ठेवीदार आक्रमक 

कर्नाळा बॅंकेतील ठेवीदार, खातेदारांना आश्वासन देऊनसुद्धा पैसे मिळाले नाहीत. बॅंकेतील हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून पनवेल येथील कर्नाळा बॅंकेच्या मुख्य शाखेवर भव्य मोर्चा देखील काढला होता. या मोर्चामध्ये हजारो ठेवीदार सहभागी झाले होते.

मोठी बातमी -  शीना बोरा हत्या प्रकरण: माजी पोलिस आयुक्तांचा 'मोठा' गौप्यस्फोट.. 

कर्नाळा बॅंकेत ५१३ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. बॅंकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील हे ठेवीदारांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने हजारो कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ठेवीदारांना न्याय मिळावा, यासाठी माजी खासदार किरीट सोमैया यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समिती कार्यरत केली आहे.

karnala co operative bank scam case registered on vivek patil and 75 others 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karnala co operative bank scam case registered on vivek patil and 75 others