
ठाणे : हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अनेक मठाधिपतींनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. दत्त गगनगिरी ध्यानमंदीराचे मठाधिपती प.पु. पुरषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील १२ महाराजांनी रविवारी संध्याकाळी ठाणे येथे आनंद आश्रम येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने बेळगावात शिवसेना पक्ष वाढीला चालना मिळणार आहे.