esakal | कासा: 100 वर्षांपासून पूजल्या जातात खड्यांच्या गौरी
sakal

बोलून बातमी शोधा

Kasa Gauri Festival

कासा: 100 वर्षांपासून पूजल्या जातात खड्यांच्या गौरी

sakal_logo
By
महेंद्र पवार

कासा: गौरी (Gauri festival) म्हणजे शिवशक्तीतील शक्तीचे रूप असतात. खड्यांच्या रूपाने साक्षात पार्वतीची पूजा (Parvati Goddess) केली जाते. निसर्गातील शक्तीची (natural power) निसर्गातील साधनांच्या माध्यमातून पूजा करणे व त्या निसर्गातच विलिन करणे हा या मागचा मूळ उद्देश असतो.

नदी किंवा विहिरीच्या म्हणजे जलस्त्रोताच्या जवळील सात खडे कुमारीकांनी गोळा करायचे असतात. त्यांना स्वच्छ धुऊन त्यांची हळद, कुंकु, फुले वाहून तिथेच पूजा केली जाते. त्यानंतर त्या ताम्हणात किंवा तुमच्या जवळील पात्रात नवे कापड टाकून ठेवल्या जातात. त्या गौराई घेऊन कुमारीका घराकडे निघतात. यावेळी रस्त्यात त्यांनी मागे वळून पहायचे नाही तसेच बोलायचे नाही हा नियम पाळला जातो. मुली लहान असल्या तर त्या बोलू नयेत यासाठी त्यांनी तोंडात पाणी धरायला लावतात व घरी आल्यानंतर चूळ भरायला लावतात.

हेही वाचा: गणेशोत्सवानंतर दररोज 60,000 कोविड चाचण्यांचे पालिकेचे लक्ष्य

घरी आल्यानंतर घरातील कर्ती स्त्री दारातच कुमारीकांचे पाय दूध व पाण्याने धुऊन त्यांची पूजा करते. नंतर गौरीची रांगोळीने संपूर्ण घरात पावले काढली जातात. त्यांच्यावरून गौरींना घरभर फिरवले जाते. त्यानंतर घरातील देवघराजवळ चांदीच्या पात्रात किंवा पाटावर ठेऊन त्यांची आरासा मध्ये बसवून पूजा केली जाते. यावेळी देवीची आरती म्हणून व कापसाचे वस्त्र वाहून त्यांची स्थापना केली जाते. या गौरी इतर गौरींप्रमाणे तिस-या दिवशी विसर्जित केल्या जातात.

या गौरींना पहिल्या दिवशी नेहमीच्या जेवणाचाच नैवेद्य दाखवला जातो. दुस-या दिवशी त्यांना तांदळाचे पीठ आणि नारळाचे दूध यापासून बनविलेल्या घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला जातो, तर तिस-या दिवशी म्हणजे विसर्जनाला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. डहाणू तालुक्यातील कासा येथील घारपुरे कुटुंब गेल्या शंभर वर्षापासून खड्याच्या गौरीचे पूजन केले जाते.या गौराईची पारंपरिक प्रथे नुसार रितीरिवाजा प्रमाणे पूजा केली जात आहे.

गौरी गणपती सणाचा मूळ उद्देशच चार दिवस सर्व कुटुंबाने एकत्र एकाच छताखाली गुण्यागोविंदाने राहणे सुखदुःखाच्या गप्पागोष्टी करणे, हीच खरी लक्ष्मी असते. ज्या घरात सुना मुलं जावा नातवंडे एकत्र येऊन सर्वजण काम करतात इथे प्रसन्नता वाटते. गौरी गणपती येतात, हातात ठेवतात जाताना सुखी भव असा आशीर्वाद देतात. कासार येथील ग्रामीण भागात गेल्या शंभर वर्षापासून भारत पुरे कुटुंबाकडून ही प्रथा नित्यनेमाने सुरू आहे. सध्या कोरोना प्रादुर्भाव असल्याने फक्त मोजक्याच नटराज मित्रमंडळींच्या साक्षीने उत्सव केला जात आहे. आज पाच दिवसाच्या गणपती विसर्जना च्या दिवशी या खड्यांच्या गौरी चे देखील विसर्जन होणार आहे.

loading image
go to top