Megablock: कसारा ब्लॉकचा लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका, १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान लोकल सेवा बंद

Kasara Megablock: कसारा ब्लॉकमुळे १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहेत. तसेच अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
Mumbai Local

Mumbai Local

ESakal

Updated on: 

मुंबई : आसनगाव-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गिका आणि कसारा यार्डच्या विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या ब्लॉकचा फटका लोकलसह मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही बसणार आहे. १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद राहणार असून, हावडा दुरांतोच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, काहींचे मार्गवळण आणि नियमन करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com