Mumbai News: विल्यम-केट यांची गल्ली क्रिकेट ते रिक्षातून सफर; स्ट्रीट फूडचाही घेतला आस्वाद

Prince William and Kate Middleton: प्रिन्स विल्यम आणि केट यांनी मुंबईत गल्ली क्रिकेट खेळण्यासोबतच रिक्षातून सफर केली. तसेच मुंबईच्या स्ट्रीट फूडचाही आस्वाद घेतला.
Prince William and Kate Middleton in Mumbai

Prince William and Kate Middleton in Mumbai

ESakal

Updated on: 

मुंबई : ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट मिडलटन यांनी सोमवारी मुंबईच्या रस्त्यांवर फेरफटका मारत शहराच्या अस्सल संस्कृतीचा अनुभव घेतला. या शाही जोडप्याच्या मुंबई सफरीत क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरही सहभागी झाला. सचिनच्या साथीने विल्यम आणि केट यांनी बॅलार्ड इस्टेट परिसरात फेरफटका मारला. या वेळी त्यांनी मुंबईचा प्रसिद्ध कटिंग चहा, कुल्हड चहा आणि स्थानिक स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतला.

Loading content, please wait...