"तारक मेहता'फेम कवी कुमार आझाद यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

मुंबई - छोट्या पडद्यावरील "तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेत डॉ. हंसराज हाथी ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेता कवी कुमार आझाद यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. मीरा रोड येथील वोक्‍हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. आरजे आलोकने त्याच्या ट्‌विटर अकाउंटवरून ही माहिती दिली.

कवी कुमार वाढत्या वजनामुळे त्रस्त होते. त्यांचे वजन 125 किलो होते. ते कमी करण्यासाठी ते उपचार घेत होते. मूळ बिहारचे असलेल्या कवी कुमार यांना "तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील डॉ. हाथीच्या भूमिकेमुळे नवी ओळख मिळाली होती. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी "मेला' आणि "फंटूश' या चित्रपटांमध्येही काम केले होते.

Web Title: Kavi Kumar Azad Death Taraq Mehta