esakal | कल्याणच्या 'त्या' प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई; आयुक्तांचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Building in kalyan

कल्याणच्या 'त्या' प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई; आयुक्तांचे आदेश

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रात अनधिकृत बांधकामाचे (Illegal Work) पेव फुटले आहे. पालिका प्रशासन कारवाई (Municipal action) करत असले तरी बांधकामे आजही सुरूच आहेत. या बांधकामांना पालिका अधिकाऱ्यांचेच अभय असल्याच्या चर्चा वारंवार होतात. अशीच एक चर्चा गेल्या दोन दिवसंपासून रंगली आहे. कल्याण ग्रामीणमधील एका अनधिकृत इमारतीवर (Illegal building) कारवाई होऊ नये म्हणून पालिका अधिकाऱ्यांना पैसे दिले, मात्र तरीही इमारतीवर कारवाई केल्याचा आरोप (builder Claims) एका विकासकाने केला आहे. यावर पालिका आयुक्तांनी या प्रकरणात चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

हेही वाचा: कोकणात अतिवृष्टीचा इशारा; मुंबईत बुधवारी ऑरेंज अलर्ट

कल्याण ग्रामीण मधील दावडी परिसरात डीपी रस्त्यात येणाऱ्या सहा मजली बेकायदा इमारतीवर केडीएमसीने चार पाच दिवसापूर्वी कारवाई केली. ही कारवाई आत्ता वादात सापडली आहे. कारवाई झाल्यानंतर विकासक मुन्ना सिंग याने पालिका प्रशासनावर आरोप केले आहेत या इमारतीवर कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्यानी वारंवार पैसे घेतले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका हॉटेलमध्ये विकासक सिंग याने पालिका अधिकारी दीपक शिंदे, उपायुक्त अनंत कदम यांची बैठक झाली. या बैठकीचे हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज सिंग यांनी समोर आणीत अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.

याविषयी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, याबाबत माझ्याकडे कोणतीही तक्रार प्राप्त नाही. अनधिकृत इमारत होती आणि ते तोडण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये कोणाची काही तक्रार असेल तर त्या तक्रारीची शहानिशा करून दोषी कोणी आढळले तर कारवाई केली जाईल. विकासक सिंग यांच्या आरोपात कितपत तथ्य आहे हे चौकशी नंतर स्पष्ट होईल. मात्र संबंधित अधिकारी विकासकसोबत त्यावेळी नक्की काय चर्चा करीत होते अशी चर्चा रंगली आहे.

जो सापडला तो चोर

"महापालिका प्रशासन सर्वच भ्रष्ट आहेत फक्त जो सापडला तो चोर. अनधिकृत बांधकामे एका रात्रीत उभे राहत नाही. ठाण्या पासून डोंबिवलीपर्यंत अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्यानेच उभी राहतात. केवळ अनधिकृत नाही तर अधिकृत बांधकाम करण्यासाठीही काही टक्केवारी घेतले जाते. दुर्दैव आहे की याविषयी कोणीच आवाज उठवत नाही."

- राजू पाटील, कल्याण ग्रामीण, आमदार

loading image
go to top