

KDMC Election Sees Major Political Twist
Esakal
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवारानं शिवसेना महायुतीच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. कल्याण ग्रामीण भागात यामुळे शिवसेना महायुतीचं पारडं जड झालं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार रामचंद्र गणपत माने हे प्रभाग क्रमांक ३० (ड) मधून लढत आहेत. त्यांनी शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुन बाबू पाटील यांनाच पाठिंबा दिल्यानं आता राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.