
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभाग कार्यालयातील फेरीवाला हटाव पथकातील आठ ते नऊ कर्मचारी बुधवारी दुपारी कार्यालयीन वेळेत पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल झाली होती. पालिका प्रशासनाने याची दखल घेत सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी संबंधित 5 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. ठराविक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच प्रभागात ठाण मांडून असून त्यांचे प्रस्थ वाढले आहे. यामुळे हे प्रकार होत असल्याची ओरड होत आहे.