संचारबंदी असूनही लोकं रस्त्यावर, मग महापौरांनी उचललं 'हे' मोठं पाऊल

संचारबंदी असूनही लोकं रस्त्यावर, मग महापौरांनी उचललं 'हे' मोठं पाऊल

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देशात लोकांमध्ये दहशतीचं वातावरण झालं आहे. आतापर्यंत देशात ५०० + लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर देशात १० लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कालपासून महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

संचारबंदी असतानाही  अनेकांनी परिस्थितीचं गांभीर्य न ओळखता रस्त्यावर येणं पसंत केलं , अनावश्यक प्रवास करणं पसंत केलं. वारंवार सांगून देखील नागरिक अजूनही घराच्या बाहेर निघत आहेत. आता या अशांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या महापौरांनी मोठं पाऊल उचललं आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे लोकांनी जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसादही दिला होता. मात्र सोमवारी आणि मंगळवारी परत लोकं आपल्या घराच्या बाहेर निघाले होते. मुंबईत तर सोमवारी काही ठिकाणी ट्रॅफिक जामसुद्धा झालं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभरात संचारबंदी लागू केली होती. मात्र आता लोकं संचारबंदीचंही पालन करताना दिसत नाहीये.
 
कोरोनाची धास्ती असूनही घराबाहेर पडलेल्या लोकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यासाठी आज कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे स्वतः रस्त्यावर उतरल्या. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ राणेही होते. आज सकाळपासून विनिता राणे यांनी लोकांना गर्दी टाळण्याचं आणि घरीच राहण्याचं आवाहन केलं.

लोकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी एकच गर्दी करू नये असा आवाहन त्यांनी केलं. तसंच भाजीवाल्यांनी एकाच जागेवर उभं राहून भाजी विकण्यापेक्षा फिरून भाजी विकावी म्हणजे जास्त लोक एकाच जागेवर गर्दी करणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे स्वतः महापौरांना रस्त्यावर बघून लोकंची गर्दी कमी व्हायला सुरुवात झाली आहे. 

KDMC mayor comes on ground to tell people not to come out in lock down situation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com