

KDMC Mayor
ESakal
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे महापौर पदी शिंदे सेनेचा महापौर बसणार हे चित्र आज जवळपास स्पष्ट झाले. शिवसेनेच्या नगरसेविका ॲड. हर्षाली थविल यांनी महापौर पदासाठी तर भाजपाचे नगरसेवक राहूल दामले यांनी उप महापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल केला. शिंदे सेना, भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्र येत महायुतीमधील नगरसेवकांचे अर्ज दाखल केल्याने महिनाभर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर आज अखेर पडदा पडला.