KDMC News : कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांमुळे नागरिक बेहाल ; पालिकेचं दुर्लक्ष !

KDMC News : कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांमुळे नागरिक बेहाल ; पालिकेचं दुर्लक्ष !

डोंबिवली, ता. २ : गणेशोत्सव होऊन गेला तरी कल्याण-डोंबिवली परिसरातील रस्त्यांवरील खड्डे हे जैसे थे आहेत. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे हे डांबरीकरण करून भरले जातील, असे आश्वासन पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले होते; मात्र केवळ खडी व मातीचा भराव टाकून काही खड्डे बुजविले जात असून उर्वरित खड्डे तसेच असल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची स्थिती ही खड्डे पडून दयनीय झाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. खड्ड्यांवरून प्रशासनावर टीका केली जात असताना पालिकेचे अधिकारी रस्त्यांची स्थिती सुधारण्यात अपयशी ठरले आहेत का ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्त, शहर अभियंता, अधिकारी यांनी यापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी केली आहे. खड्डे योग्य पद्धतीने न भरल्यास किंवा काम दर्जेदार न केल्यास कंत्राटदारांवर कारवाई करू, अशा घोषणा केल्या गेल्या. मात्र ही कारवाई कुठेही झालेली दिसून आली नाही. त्यामुळे शहरातील खड्डे अजूनही जैसे थे आहेत.

KDMC News : कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांमुळे नागरिक बेहाल ; पालिकेचं दुर्लक्ष !
KDMC News : 27 गावातील माजी लोकप्रतिनिधींना अश्रू अनावर ; संघर्ष समितीच्या सभेत ताशेरे

पालिका आयुक्तांनी रस्त्यांची पाहणी करताना गणेशोत्सवापूर्वी डांबरीकरणाने खड्डे भरून रस्ते सुस्थितीत केले जातील, असे आश्वासन दिले होते. गणेशोत्सव होऊन गेला तरी रस्ते स्थिती सुधारलेली नाही. कंत्राटदार डांबरीकरण करण्याऐवजी माती व खडी टाकून खड्डे भरत असून वाहनांच्या वर्दळीमुळे अवघ्या काही तासात ही खडी इतरत्र पसरून खड्डे उघडे पडत आहेत. उलट या खडीमुळे दुचाकी घसरणे, धूळ उडणे या समस्या उद्‌भवत आहेत.

कंत्राटदार मनमानी पद्धतीने खड्डे भरण्याचे काम करत आहेत. एका रस्त्यावरील सर्व खड्डे न भरता अर्धवट कामे करण्यात येत आहेत. तसेच गणेशोत्सव आधी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके खड्डे डांबरने भरले गेले मात्र इतर खड्डे खडी टाकून भरण्यात येत आहेत.

KDMC News : कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांमुळे नागरिक बेहाल ; पालिकेचं दुर्लक्ष !
KDMC: '..अन्यथा 27 गाव आणि पलावा मधील नागरिक कर भरणार नाहीत' मनसेचे आमदार राजू पाटील कडाडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com