KDMC च्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण; माजी नगरसेवकासह पत्नीवर गुन्हा दाखल | kalyan-dombivali crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KDMC

KDMC च्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण; माजी नगरसेवकासह पत्नीवर गुन्हा दाखल

डोंबिवली : मोहने येथील एका बेकायदेशीर बांधकामावर कारवाई दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेचे (KDMC) सहाय्यक आयुक्त राजेश सावंत (Rajesh sawant) यांना माजी नगरसेवक मुकुंद कोट (corporator mukund kote) यांनी मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात (khadakpada police station) शिवसेनेचे मुकुंद कोट यांच्यासह त्यांच्या पत्नीवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे.

हेही वाचा: दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला आरोपमुक्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश

शहरातील बेकायदेशीर बांधकामावर पालिका प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. चालू बांधकामावर त्वरित कारवाईचे आदेश आहेत त्यानुसार मोहने गावातील एका बांधकामाविषयी तक्रार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग क्षेत्र कार्यालयातील उपायुक्त अर्चना दवे यांचकडे केली होती. प्राप्त माहितीनुसार अ प्रभागक्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी बुधवारी दुपारी पालिका पथकासह कारवाई केली. तेथील जोत चे बांधकाम पालिका प्रशासनाने निष्कासित केले. यावर काही लोकांनी येथे पूर्वी मंदिर असल्याचे सहाय्यक आयुक्तांना सांगितले मात्र तेथे तसे काही आढळून आले नाही. त्यानंतर आणखी एका इमारत बांधकामावर कारवाई करून सावंत आणि पालिका कर्मचारी अ प्रभाग कार्यालयात परतले.

तेथे शिवसेनेचे माजी नगरसेवक मुकुंद कोट हे 10 ते 12 जणांना घेऊन आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. कोट यांनी सावंत यांच्या कानाखाली मारून त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार सावंत यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top