दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला आरोपमुक्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश | Mumbai High Court | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai High Court

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला आरोपमुक्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार (crore rupees fraud) प्रकरणात गुन्हा दाखल (police FIR) झालेल्या दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला (Diwan housing finance ltd) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) बुधवारी आरोपमुक्त करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा: "एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा"

राष्ट्रीय कंपनी विधी आयोगाने जूनमध्ये डिएचएफएलचे विलिनीकरण पिरामल कॅपिटल एड हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये समंत केले आहे. कंपनीच्या वतीने गैरव्यवहार प्रकरणातून आरोप मुक्त होण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. मात्र हा अर्ज अमान्य करण्यात आला. त्यामुळे कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कंपनीच्या भांडवली दिवाळखोरी कारवाई ठरावानंतर झालेल्या व्यवहारांसाठी जबाबदार ठरु शकत नाही, असा दावा यावेळी करण्यात आला.

सीबीआय आणि आरोपी कपिल वाधवान, राकेश वाधवान आणि यस बँक प्रमुख राणा कपूर यांनी याचिकेला विरोध केला. न्या संदीप शिंदे यांनी सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यावर डिएचएफएलला आरोपमुक्त करण्याचे आदेश दिले. डिएचएफएलचे विलिनीकरण रद्द न करण्याचा निर्णय राष्ट्रीय कंपनी विधी अपिलात आयोगाने दिला आहे. याची नोंद उच्च न्यायालयाने घेतली असून कंपनीला दोषमुक्त करण्याचे आदेश दिले.

loading image
go to top