

KDMC Bus
ESakal
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली मार्ग क्रमांक तीन (साई चौक- सह्याद्रीनगर- कल्याण स्थानक) ही बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेना शहरप्रमुख तथा परिवहन कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही सेवा (गुरुवारपासून)प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे.