esakal | रुग्णाचे नातेवाईक आणि वॉर्ड बॉय यांच्यात वाद; कारवाई करण्याचे KDMC चे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

Ward boy

रुग्णाचे नातेवाईक आणि वॉर्ड बॉय यांच्यात वाद; कारवाई करण्याचे KDMC चे आदेश

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयातील (Shastri nagar hospital) ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. रुग्णालयातील परिचारिका आणि वॉर्ड बॉय झोपा काढत असल्याचे एका व्हायरल व्हिडीओ (Viral Video) मध्ये समोर आले आहे. अत्यावश्यक उपचार (Emergency treatment) घेण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी या झोपलेल्या वॉर्ड (Ward boy sleeping) बॉयला उठविण्याचा प्रयत्न केला असता, वॉर्ड बॉय त्यांच्या अंगावर धावून जाऊन नातेवाईकांना शिवीगाळ (Abusing patients relative) केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

हेही वाचा: अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. दिलीप मालखेडे यांची नियुक्ती

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शनिवारी पहाटे आनंद नवसागरे ते त्याचे वडील बाबुराव नवसागरे ( वय 70) यांना छातीत दुखत असल्याने उपचारासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचारी हे लाईट बंद करून झोपले असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी वऑर्ड बॉय यांना उठविण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रतिसाद देत नव्हता. अखेर आनंद यांनी याचा व्हिडीओ बनविण्यास सुरवात केली.

त्यानंतर परिचारिका व वॉर्ड बॉय तेथे आले. वॉर्ड बॉयने त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून नागरिक त्यावर आपला रोष व्यक्त करीत आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच पालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली. आनंद नवसागरे हे रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष असून सेनेच्या शिष्टमंडळाने रुग्णालय प्रशासनाची भेट घेत रुग्ण नातेवाईकांशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

"समाज माध्यमावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यासंबंधी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांचा खुलासा आल्यानंतर सोमवारी कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे कळविले जाईल."

डॉ. सुहासिनी बडेकर, वैद्यकीय अधिकारी शास्त्रीनगर रुग्णालय

loading image
go to top